दिवस 6 – उत्तर

दिवस 6 – उत्तर

देवाच्या अस्तित्त्वाकडे दुर्लक्ष करून किंवा देव नाकारून, आपला अंतिम परिणाम अनंतकाळ मृत्यू होईल. याचा अर्थ भगवंताशी कोणताही संबंध नसलेले भावी जीवन.

देव म्हणजे पुरेपूर प्रेम असेल तर हा तिढा तो कसा बरे सोडवू शकेल? मूलभूत नियमांचे उल्लंघन करणे हाच ज्यांचा हेतू आहे अशा अपरिपूर्ण लोकांचा तो कसा स्वीकार करू शकेल?  तो त्याचे प्रेम कसे व्यक्त करेल ज्यायोगे त्याला प्रतिसाद देता येईल?

जामीन

जर कोणी तुमच्या चुकांची काळजी घेण्यास सक्षम असेल तर?  तो असा हवा की जो कोणी पवित्र आहे, कोणी असे की जे देवाच्या मानकांवर खरे उतरत असेल. जर कोणी तुम्ही आणि देव यांच्यामध्ये मध्यस्थी करू शकला तर? कोणीतरी जो तुमची काळजी घेऊ शकतो आणि तुम्ही तुमचे आयुष्यभरासाठी केलेले  नुकसान भरून काढू शकतो.

पण, हे कोण करू शकेल? कोणताही मनुष्यप्राणी त्या परीपुर्णतेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि परिपूर्णतेचा दर्जा धारण करू शकत नाही. ही भूमिका सक्षमपणे पर पडण्यासाठी एखाद्या दैवी गुणधर्मांचीच गरज आहे. असे कोणीतरी जे तुम्ही बिघडवून टाकलेल्याची भरपे करू शकेल. कोणीही एखादी व्यक्ती एत्रींच्या चुकांसाठी जमीनदार राहून, त्या चुकांची भरपाई करू शकत नाही. कदाचित एकाच वेळी, परंतु निश्चितपणे नेहमी नाही

देव उपाय आहे

जर देवानेच, तुम्ही बिघडवलेल्या गोष्टी निस्तरण्यासाठी कोणाला पाठवले तर?  जो आपल्या एकाच, मोठ्या दिव्य कार्याने देव आणि आपण यामधे उभा राहून सर्व अडथळे दूर करील.  आपल्या जीवनात आपली त्या व्यक्तीशी भेट झाली आहे का?

जो कोणी तुमच्यासाठी भगवंताशी उभा राहू शकतो. जो तुमच्या कृत्यांची भरपाई करू शकतो. असा कोणीतरी जो हे सर्व अशाप्रकारे करेल की आयुष्यावर त्याचा एक अविस्मरणीय ठसा उमटेल?

एखादि व्यक्ती स्वत:च्या चुकींसाठी सर्वात मोठा मोबदला काय देऊ शकेल? उत्तर आहे: त्याचे स्वत:चे प्राण;  मनुष्याकडे असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट. जर आजवर आपण आयुष्यात ज्या चुका केल्या त्यासाठी, आणि एतून पुढे आपण ज्या चुका करू त्याची भरपे म्हणून एखाद्याने आपले प्राण देले असतील तर?

हे तंतोतंत असेच घडले आहे – देवाने आपल्या चुका आणि आपल्या उणीवांना जामीन राहील अशी व्यक्ती पाठविली आहे. याद्वारे, देवाने मनुष्याच्या निवडीच्या स्वातंत्र्याच्या कारणाने त्याच्या आणि मनुष्यांच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या अंतराची समस्या दूर केली आहे .

कोणीही मनुष्य आपल्यासाठी बेल्समन असू शकत नाही कारण इतर प्रत्येक माणसाची स्वतःची कमतरता असते आणि शेवटी, ते देवाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत.

देवाने  यासाठी ज्याला पाठवले होते तो असातसा कोणी नाही … त्याने हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वत:च्या मुलाला पाठविले. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, पृथ्वीवर एक मानव म्हणून आला, एक बाळ बनून आणि तुमाच्या आमच्यासारखाच वाढला. एक मनुष्यप्राणी म्हणून त्याला तुमच्या माझ्ह्यासारख्याच सर्व अडचणीआणि प्रलोभने आली.पण त्याने त्या सर्वांचा सामना करून दाखवून दिले की देवाच्या मानकांनुसार जगणे शक्य आहे.

पण, हे एवढेच नव्हते. देवाचे लोकांप्रती इतके प्रेम होते की देवाने स्वत:च्या मुलाचे बलिदान दिले, अशा लोकांसाठी की ज्यांचा असा विश्वास होता की देवाच्या मृत्युनंतरच त्यांच्या सर्व चुका बाजूला सारल्या जातील व त्यांच्यात व भगवंतामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण होऊ शकेल.

आजवरची सर्वोत्तम ऑफर!

देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, पृथ्वीवर क्रूसावर मरण पावला आणि तीन दिवसांपर्यंत दफनभूमीत मृत होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर पुनरुत्थान करून तो मृत्यूपेक्षाही अधिक शक्तिवान होता हे त्याने  सिद्ध केले. त्याचे रक्त सांडून त्याने तुमच्या आणि माझ्या हातून घडलेल्या सर्व वाईट गोष्टींचा निपटारा केला आहे. त्याच्या हस्तक्षेपामुळे , देव अजूनही नीतिवान राहू शकतो आणि आपण भगवंताशी एक अविनाशी संबंध जोडू शकतो.

सुरुवातीला हे कितीहि अनाकलनिय वाटत असेल, तरी  तुमच्या आणि त्याच्यातील नातेसंबंधाचे पुनरुज्जीवन करण्याकरिता देवाने ही मोठी ऑफर दिली आहे!

येशू ख्रिस्ताच्या हस्तक्षेपाद्वारे, भगवंताशी असलेल्या नातेसंबंधाचा मार्ग खुला आहे. त्याला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही हे स्वीकारावे की भगवंताने तुमच्या चुकांसाठी बलिदान देण्यास त्याच्या पुत्रास धाडले आहे आणि भविष्यात तुम्ही भगवंताचा या विश्वाचा निर्माता आणि भावी जीवनाचा मार्गदर्शक म्हणून आदर करावा.

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची निवड!

जर तुम्ही यावर विश्वास ठेवाल आणि हे मान्य कराल, तर तुम्ही प्रभावीपणे देवाच्या योजनांचा भाग होऊ शकता. तुम्ही अनुभवलं की  भविष्यातील आयुष्य आपल्या कधीही कल्पना केली नसेल इतके अधिक अर्थपूर्ण होईल.

या टप्प्यावर, आपण आपल्या आयुष्याच्या मोठ्या वळणावर उभे आहात. आपण यावर विश्वास ठेवू शकता आणि स्वीकारू शकता, परंतु आपण हे सर्व सोडूनही देऊ शकता. ती तुमची निवड असेल.  

आपण विश्वास ठेवला आणि स्वीकारल्यास, आपण आपल्या निर्मात्याच्या योजनेचा भाग होऊ शकता आपले भविष्य आपल्या कल्पनेपेक्षाही आकर्षक असेल.  

आता कदाचित हे आपल्यासाठी नवीन आहे आपण येशू ख्रिस्त बद्दल अधिक वाचू इच्छित असल्यास  या दुव्यांचा वापर करा :

दिवस ६ बद्दल विचार करण्यासाठी प्रश्न:

  • देवाच्या परिपूर्ण दर्जां गाठण्यास आपण पात्र नाही असे तुम्हाला वाटते का?
  • देवाला तुम्ही आवडता असे तुम्हाला वाटते का?
  • तुमचे आज्ञाभंग आणि चुकांची किंमत मोजण्यासाठी देवाने आपला पुत्र येशू यास पृथ्वीवर पाठवले आहे हे आपण मान्य करण्यास तयार आहात का?

आपला सर्वोत्तम दिवस अद्याप यायचा आहे  ७ व्या दिवशी परत या!

7 दिवस सुरू ठेवा

येशूचे जीवन

येशूचे जीवन

आपण जसे वाचले आहे त्याप्रमाणे देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला मानव म्हणून जगण्यासाठी पृथ्वीतलावर पाठविण्याचा निर्णय घेतला. येशू (ज्याला ख्रिस्त...
येशू देवाचा पुत्र

येशू देवाचा पुत्र

येशूला "देवाचा पुत्र" का म्हटले आहे? स्वतः येशूने म्हटले की तो देवाचा पुत्र होता: "मग ते सर्व म्हणाले, 'मग तू...
बायबल, देवाचे पुस्तक

बायबल, देवाचे पुस्तक

बायबल हे केवळ एक पुस्तक नाही वास्तविक, हे एक पुस्तक नाही, परंतु 66 पुस्तकांचे एक ग्रंथालय आहे. त्यात ऐतिहासिक पुस्तके,...
बायबल मधील काही उपयुक्त वचने

बायबल मधील काही उपयुक्त वचने

देवाच्या प्रीतीत अध्याय 3:16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी...
बाप्तिस्मा

बाप्तिस्मा

आपण येशूचे खरे अनुयायी आहोत हे इतर लोकांना दर्शविण्यासाठी बाप्तिस्मा हे "बाह्य चिन्ह" आहे बाप्तिस्मा करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे....
प्रार्थना

प्रार्थना

प्रार्थना म्हणजे देवाशी (आणि देवासह) बोलणे. जरी बरेचदा देव तुम्हाला थेट उत्तर देणार नाही, तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेत त्याचे लक्ष...
पवित्र आत्मा

पवित्र आत्मा

बायबल आपल्याला शिकवते की देवामध्ये तीन व्यक्तींचा समावेश आहे. त्याला ट्रिनिटी देखील म्हणतात. आपल्यासाठी मानव म्हणून समजणे अवघड आहे की...
चर्च

चर्च

जेव्हा आपण ख्रिस्ती झालात, तेव्हा स्थानिक चर्चला भेट देण्यास सुचविले जाते. जर तिथे चर्च नसेल, तर आपण इतर ख्रिस्ती लोकांना...