दिवस 5 – निर्मात्याला नाव आहे

दिवस 5 – निर्मात्याला नाव आहे

आपण कधीही निर्मात्या बद्दल ऐकले आहे का ? त्याला एक नाव असावे का?

कदाचित हे आपल्यासाठी आश्चर्यकारक नाही: या निर्मात्याकडे परिचित नाव आहे: देव

देवाबद्दल तुमचा स्वतःचा दृष्टीकोन असू शकेल .

ही प्रतिमा योग्य धारणेवर आधारित आहे की नाही हे शोधण्यासाठी वाचा.

तुम्ही चिकिस्तकपणे पहा आणि येथे लिहिलेल्या सर्वच गोष्टींचा फक्त स्वीकार करू नका. देवाचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी तुम्ही वेळ द्याल याची खातरजमा करा. खुल्या मनाने विचार करा आणि आपल्या पूर्व संकल्पना आणि इतरांकडून आपण जे काही स्वीकारले आहे त्यानी आपला  शोध मर्यादित करू नका.

देव स्वतःला प्रगट का करत नाही?

तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडेल की देव दिसत का नाही? तो कोण आहे हे पाहणे अधिक सोपे असेल. पण हे कसे शक्य आहे? तो सर्वांपेक्षा सर्वोच्च अस्तित्व आहे. जर उघड्या डोळ्यांनी आपण सूर्याकडे pahu शकत नाही तर देवाकडे पाहणे किती कठीण असेल, ज्याने उघड्या डोळ्यांनी सूर्य बनविला?

याशिवाय, आपण स्वतःच्या डोळ्यांनि देवाला पाहू शकलो, तर आपल्याला फार निवडीचे स्वातंत्र्य उरणार नाही. तुम्ही  आपण कदाचित आपोआप त्याचे आज्ञापालक व्हाल. त्याच्या दृश्यमान उपस्थितीशिवाय, तुम्ही तुमचे खरे स्वभाव दर्शवाल. जसे की जेंव्हा पालक घरी नसतात तेव्हा घरात एकटी असणारी लहान मुले काय करतात?

विश्व विशिष्ठ क्रम आणि संरचनेसह बांधले आहे. इथे असे कायदे आहेत जे “बरोबर” आणि “चुक” यांना देखील लागू होतात. प्रत्येक व्यक्तीला चांगले काय आणि वाईट काय आहे याची जाणीव आहे. जर देव या सर्व गोष्टींचा रचनाकार असेल तर तो इतरांपेक्षा अधिक बरोबर असणारच. तो कोणत्याही चुकीला शिक्षा ना देता माफ करू शकत नाही. जर त्याने असे केले तर इतर कोणतीही व्यक्ती त्याच्याकडून अशाच वर्तणुकीची अपेक्षा करेल, आणि परिणामतः सर्व चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाईल आणि अन्याय होईल

एखाद्या गोष्टीचे उल्लंघन याचाच अर्थ त्याच्या परिणामांसाठी तुम्ही जबाबदार आहात, मग भले ते lahan असो वा मोठे..

सर्व लोक स्वतःच्या फायद्यासाठी स्वतंत्र असणे निवडत असल्यामुळे, आधी किंवा नंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या निर्मात्याकडे दुर्लक्ष करेल. छोटासा आज्ञाभंग, प्रत्येक चुक तुम्हाला अशुद्ध करते, आणि मग तुम्ही देवापुढे परिपूर्ण आणि देवाचा न्याय मिळविण्यास सक्षम राहत नाही.

जर तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल की देव आहे, आणि या सर्वाचा तोच निर्माता आहे, तर तुम्हाला त्याचे अस्तित्त्व त्याच्या निर्मितीतून आणि निसर्गाच्या नियमांतून जाणवू शकेल.

सर्वात मोठी योजना

निवडीच्या स्वातंत्र्याचा परिणाम हा विनाशकारी दिसतो. कारण जर प्रत्येक मनुष्याने देवाची आज्ञा पाळली नाही, तर तो अखेरीस त्या ईश्वरापुढे नीतिमत्तापुर्वक उभा राहू शकणार नाही.

हे आणखी स्पष्ट करण्यासाठी: देवाच्या योजनांच्या विरोधात गेले तर शिक्षा होते. काही लोक शेकडो किंवा हजारो लोकांचा खून करण्यासाठी जबाबदार आहेत. हे उघडच आहे की त्यांना शिक्षा होईल. पण आज्ञेचे चिते उल्लंघन आणि मोठ्या प्रमाणात उल्लंघन यामधील रेषा कुठे आहे?

पूर्वी सांगितल्याप्रमाणे, देव आमचा निर्माणकर्ता, “काळा आणि पांढरा” आहे. प्राणीमात्रांना असलेल्या इच्छास्वातंत्र्यमुळे, त्यांची स्वत: साठी निवडण्याची प्रवृत्ती असते, त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. त्यांना स्वतःचे जीवन स्वत:च्या ताब्यात हवे आहे.

छोटासा आज्ञाभंग, जीवनातील चूक तुम्हाला अशुद्ध करते, आणि मग तुम्ही परिपूर्ण आणि विशुद्ध अशा देवाला सामोरे जाऊ शकत नाही. आपण स्वत:च या समस्येचे निराकरण करू शकाल असा कोणताही मार्ग नाही.

परंतु, जर देव, आपला निर्माणकर्ता, आपली काळजी वहात असेल तर ? अखेरीस तुम्ही त्याचे प्राणीमात्र आहोत, त्याने तुम्हाला बनविले!

जर त्याने त्याच्या सर्व सृष्टीला त्याचे महत्त्व दर्शविण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोचावे म्हणून संपूर्ण विश्व निर्माण केले असेल तर?

जर देवाला स्वत:ला तुमच्यासोबत वाटून घ्यायचे असेल तर, त्याला गरज आहे म्हणून नाही तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो म्हणून तर?

मग ही समस्या कशी सोडवता येईल? वाचा म्हणजे जगासाठीच्या सर्वात मोठ्या योजनेबद्दल आपल्याला अधिक तपशील मिळेल.

चांगले आणि वाईटाची शिल्लक नाही

जर कुणीतरी एखाद्यास दुखावले असेल तर त्या दोघांमधील संबंध बिघडतील. क्षमेने संबंध सुधारतील पण जर काही तुटले असेल तर नुकसानभरपाईची अपेक्षा केली जाईल. हीच गोष्ट कोणी तरी कायद्याचे उल्लंघन करते तेव्हाही लागू होते, म्हणजे गुन्हेगाराला दंड भरावा लागेल   किंवा तुरुंगात टाकले जाईल. जितके मोठे उल्लंघन, तितकीच गंभीर शिक्षा.

देवा संदर्भात ते वेगळे आहे – त्याला कायम व विश्वासू संबंध अपेक्षित आहे. आपण मनुष्य मात्र  खरोखरच हि अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहोत. प्रामाणिकपणे पाहिल्यास प्रत्यक मनुष्यामध्ये काही ना काही कमतरता आहेत, आणि बऱ्याचदा मनुष्य केवळ स्वत:च्या भल्याचा विचार करतो आणि तशाच कृती करतो.

भगवंतापाशी, चांगल्या वाइटाचा हिशोब नाही – त्याला आपल्या आणि त्याच्यामध्ये एक विश्वासाचे नाते अपेक्षित आहे. तथापि, आपण पटकन पैसे, संपत्ती, सत्ता, कुटुंब आणि इतर नातेसंबंधातील यांमध्ये गुंतले जातो ज्यामुळे आपल्या देवासोबाताच्या नात्यात पुन्हा पुन्हा दुरावा निर्माण होतो.

म्हणून, आम्ही भगवंताशी असलेल्या नातेसंबंधात कधीच अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. आपण कधीही परिपूर्ण अशा कोणाला भेटले आहेत का? कोणीतरी असे जे नेहमी योग्य गोष्ट करतात  आणि त्यांनी कधीही कोणाला दुखावले नाही ? आपण जितके एखाद्याला अधिक चांगले ओळखू लागता तितके जास्त आपल्याला लक्षात येते की या व्यक्तीच्या देखील काही कमतरता आहेत आणि तो किंवा ती नेहमी स्वत:च्याच भल्यामध्ये स्वारस्य मानतो.

भगवंताशी असलेल्या नातेसंबंधात अपेक्षित अशा परिपूर्ण मानकांपर्यंत पोचणे मनुष्यप्राण्यास शक्य नाही. आपण ज्या चुका करत आहोत त्यास देव क्षमा करू शकत नाही कारण मग तो त्यांतर ‘बरोबर’ उरणार नाही. हे कधीही कसे सोडवता येईल?

आजच्याबद्दल विचार करण्यासाठी:

  • तुम्हाला समस्या लक्षात आली ? देवाचा प्रामाणिकपणे आदर करणारे खरच कोणी आहे का ? किंवा प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःच्याच भल्याचा विचार करतो आहे ?
  • देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून तुम्ही स्वत:च स्वतःच्या कमतरता आणि चुका कशा प्रकारे बरे सुधारू शकाल?
  • आपण मोठ्या योजनेचा भाग कसे आहात ?

या साऱ्याचा उर्वरित दिवसात विचार सुरु ठेवा आणि उद्या परत या !

6 दिवस सुरू ठेवा