दिवस 4 – जीवनाचा अर्थ

दिवस 4 – जीवनाचा अर्थ

या रचनाकाराला आपल्याबद्दल रस आहे की नाही या प्रश्नावर पुढे जाण्यापूर्वी, आपण त्या रचनाकाराबद्दल आणि त्याच्या योजनेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

हे विश्व, पृथ्वी आणि ह्या सर्व गोष्टी निर्माण करण्याची या निर्मात्याला काय बरे आवश्यकता आहे? तो त्याच्या पूर्वीच्या परिस्थितीबाबत असमाधानी होता का? त्याला कंटाळा आला आणि काही नवीन साहसी करावेसे वाटले का?  त्याला याहीपेक्षा काही वेगळे जे त्याला स्वत:लाही  अचंबित करेल असे काही करायला आवडेल का?  

आणि मग त्याच्या निर्मिती जर त्याच्या कल्पने इतकी विस्मयकारी नसेल तर तो का बर या  सगळ्याचा नाश करणार नाही?

जर आपल्या सर्वांच्या अस्तित्वामागे काही भव्य योजना असेल, जी आपण बघू शकत नाही इतकी मोठी ? आम्ही ते काही प्रमाणात समजून घेवू शकतो का? तसे असल्यास, हि योजना कशी  असेल?

मोठी योजना प्रकट

जर रचनाकाराने आपली महत्ता, आपल्या प्राणीमात्रांसोबत वाटून घेता यावी यासाठी आपली निर्मिती केली असेल तर?

एक जीव आपल्या निर्मात्याविषयी आदर आणि कृतज्ञता कशी दर्शवू शकेल ? निवडीचे स्वातंत्र्य फरक घडवून आणते: जर एखादा प्राणीमात्र त्याच्या निर्मात्याचा स्वीकार आणि आदर करण्यास निवडू शकतो, तर तो किंवा ती त्याला नाकारू पण शकते. तथापि, जेव्हा एखादी निर्मिती आपल्या निर्मात्याकडे दुर्लक्ष करते किंवा कदाचित त्याला विरोधही करते तेंव्हा अर्थातच त्या निर्मात्याचा  अपमान होईल. हे म्हणजे मुलाने आपल्या बापाच्या किंवा आईच्या अस्तित्वाची जाणीव न ठेवण्यासारखे झाले.

या कल्पनातीत अशा दिव्य निर्मात्यासमोर एखादा जीव उभा राहू शकेल का?  ह्या रचनाकाराला परिपूर्णतेची अपेक्षा आहे, कारण तो परिपूर्ण आणि नैतिक शुद्ध असलाच पाहिजे: जे आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो. अखेरीस, जर तो सातत्यपूर्ण, शुद्ध आणि परिपूर्ण नसेल तर कदाचित या विश्वात अंदाधुंद माजेल.

जर आपल्याला या रचनाकाराचे चित्र बनवायचे असेल, तर आपण निसर्ग नियमांचे कार्य पाहू शकतो. संपूर्ण ब्रम्हांड या निश्चित नियमांनुसार कार्य करते हे लक्षात घेता, हा रचनाकार नक्कीच काही निश्चित रचना आणि क्रमबद्धता यांचाही निर्माता असणार.

जर तुम्ही निसर्ग नियम पाळणार नसाल तर त्याचा परिणाम संपूर्ण अंदाधुंदी होईल. जसे आपल्याला  निसर्गात आढळते , गोष्टी निश्चित नियमांनुसार कार्य करतात. हे कायदे हे सुनिश्चित करतात की जीवन शक्य आहे. जसे आपण फुले आणि लोकांमध्ये पहिले की प्रणाली आणि प्रक्रियांचे जटिल मिश्रण अविभाज्य आहे

निसर्ग नियमांमध्ये गोंधळ घालणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. जर तसे शक्य असते, तर ही संपूर्ण प्रणालीच बऱ्याच काळापूर्वी संपूर्ण गोंधळात पडली असती. निसर्गनियमांचे परिणाम सोपे आणि स्पष्ट आहेत. तुम्ही तुमचे सर्वोत्तम करू शकता, परंतु आपण गुरुत्वाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्हाला हे गुरुत्वाकर्षण आहे हे मान्य करावेच लागते आणि लहानपणापासूनच तुम्ही कधी घसरून पडत, कधी उठून बसत या गुरुत्त्वाकर्ष्णासोबत राहायला शिकता. सर्व नियमांचे परिणाम म्हणजे, एकदा चूक झाल्यानंतर शिक्षाआपोआपच होणार. हे जीवनाचे एक सुप्रसिद्ध तथ्य आहे. उदाहरणार्थ, आपण गुरुत्वाकर्षणास नाकारू शकत नाही. आपण त्याला लाच देऊ शकत नाही, आपल्याला फक्त त्यास सामोरे जायचे आहे.

हीच गोष्ट या निर्मात्याच्या संबंधात अगदी लागू आहे; जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल आणि त्याच्या आज्ञेचे पालन करीत नसाल तर तुमचा काहीच उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतातील तण काढून टाकेल आणि चांगल्या पिकांची कापणी करत असेल ज्यायोगे त्यांची चांगली वाढ होईल.

निर्माता एकदम काळा आणि सफेत असाच असणार, एखादी गोष्ट एकतर चांगली आहे अथवा चांगली  नाही, त्याला लाच देता येत नाही.  हाच निष्कर्ष ज्या निसर्ग नियमांचे आपण पालन करतो त्यातूनही  काढता येते

काय आपण योजनेचा भाग आहात?

जर एखाद्याच्या निर्मात्याला नकार दिला तर त्याचा थेट निर्णय होईल, पण निवडीच्या स्वातंत्र्याबद्दल काय? आयुष्यात आपण आपले पर्याय निवडू शकतो तथापि, एका विशिष्ट क्षणी, वेळ संपते. जर प्राणी आपल्या निर्मात्याला नकार देत राहील, तर या जीवाचा अखेरपर्यंत काही उपयोग होणार नाही.

कदाचित आपण आपल्या आसपास असणाऱ्या आणि या योजनेतून बाहेर राहणाऱ्या लोकांबाबत याचे परिणाम पाहू शकता:

  • का बर बऱ्याचदा धनाढ्य लोक, अगदी सुप्रसिद्ध आणि निरोगी लोक देखील आपल्या जीवनाबद्दल समाधानी नसतात?
  • सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोक त्यांच्या स्थितीबद्दल नेहमी असमाधानी का असतात?
  • आयुष्यातील भौतिक ध्येये कितीही गाठली तरी कोणासही पूर्णपणे समाधान मिळाले आहे का? तुमच्याकडे काही गोष्टी असल्या तरीही, नेहमी अजून असावे अशी आस असते.
  • लोक मृत्यूला का घाबरतात? मृत्यूच्या नंतर जीवन संपते म्हणून ?

आम्हाला एक विशिष्ठ पोकळी जाणवते, अजून हवे असे वाटते. आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ असावा असे वाटते.

आजसाठी एवढेच पुरे, याचा विचार करा:

  • त्या निर्मात्याच्या योजनेबाबत माझे वर्णनाचा काही अर्थ लागतो का?
  • काही योजना आहे का, त्यात तुमची भूमिका काय आहे?
  • आपण आपल्या जीवनाचे उत्तरदायित्त्व घेण्यास तयार आहात का?
  • आपल्या निर्मात्याशी आपला वर्तमान संबंध काय आहे?

उद्या ५ व्या दिवशी आपले परत स्वागत आहे!

दिवस ५ सुरू ठेवा

दिवस ५ सुरू ठेवा