दिवस 3 – योजनापूर्वक जीवन
गेल्या दोन दिवसात आपल्या हे लक्षात आले की कोठल्याही योजनेशिवाय जीवन एकदम तयार झाले हे पूर्णपणे अशक्य आहे. आता, एका रचनेसाठी , आपल्याला रचनाकाराची आवश्यकता आहे. एका विशिष्ठ प्रकारची बुद्धिमत्ता ज्याद्वारे विश्वाचा, ग्रहांचा, पृथ्वीचा आणि जीवनाचा सर्व तपशील नियोजित होतो …
जर एखादा रचनाकार असेल तर तो हे विशाल ब्रह्मांड का तयार करेल आणि का तो फक्त एक ग्रह निवडून एक जबरदस्त विकसित जीवसृष्टी तयार करेल?
या सगळ्यामागील मोठी योजना काय असेल?
आपल्या ग्रहावर इतके दुःख आहे की हा रचनाकार अद्याप त्याच्या निर्मितीची काळजी घेत आहे अशी कल्पना करणे कठीण आहे, नाही का?जर हा रचनाकार काही व्यापक विचार करत असेल आणि केवळ एखाद्या सहज चालणाऱ्या मशीनऐवजी त्याने काही अधिक साहसी असे निर्माण केले असेल तर?जर त्याने निवडीचे स्वातंत्र्य समाविष्ट करून काही योजना बनवली असेल तर काय? प्राणिमात्रांना स्वत: चे निर्णय स्वत: घेण्याच्या स्वातंत्र्यासह, अगदी स्वतःबाबतही सर्जनशील बनण्यास सक्षम होऊन. हे एखाद्या विज्ञान कल्पनारम्य सिनेमासारखे होईल जिथे यंत्रमानव जिवंत होतात, हो ना?
तो निर्मितीचा एक गहन प्रकार असेल; एक साहसी प्रकारची निर्मिती. रचनाकाराच्या योजनांविरूद्ध प्राणी निर्णय घेतील तर गोष्टी चुकीच्या ठरू शकतील.
निवडीच्या या स्वातंत्र्यामुळे, प्राणी त्या निर्मात्याकडे दुर्लक्ष पण करू शकतील किंवा त्या निर्मात्याविरोधात जाण्याचा पर्याय पण निवडू शकतील
कोण आहे हा रचनाकार?
या रचनाकाराची आपल्याकडे आधीपासूनच एखादी प्रतिमा आहे का?
त्याला तुमच्यामध्ये रस असेल का?
का तुम्ही त्याच्या अनेक उत्पादनांपैकी फक्त एक आहात ?
जर तो तुमची काळजी घेत असेल आणि तुमच्यासाठी त्याकडे काही योजना असेल तर?
या विचारांनी तुम्हाला भीती वाटेल का?
तुम्हाला एखाद्या योजनेबद्दल माहिती आहे का? तुमच्या असण्यामागचे जे प्रयोजन आहे, त्यानुसार तुम्ही वागत आहात का जे आयुष्याबद्दल उत्तम वाटते तेवढेच करत आहात?
आपण या प्रश्नांना सामोरे जाण्यास उत्सुक आहात का ?
- हा रचनाकार अजूनही त्याच्या रचनेत सहभागी असेल का? तसे असल्यास, तुम्हाला ते कसे कळेल?
- या निर्मितीच्या मागे एखादी मोठी योजना असेल का?
- रचनाकार आपल्यासोबत सहभागी होऊ शकेल का?
- तुम्ही मोठ्या योजनेनुसार वागाल का?
आजच याचा विचार करा आणि कृपया उद्या 4 वाजता परत या
.