दिवस 2 – यापेक्षा जीवनात अधिक काही आहे का?

दिवस 2 – यापेक्षा जीवनात अधिक काही आहे का?

आपण आपल्या जीवनाबद्दल विचार करता का ? किंवा आपण पुढे काय आहे याबद्दल जिज्ञासूपणे डोकावून पाहण्यासाठी क्लिक केले का ?

आपल्याला आपल्या अस्तित्वाशी संबंधित काही उत्तरे आढळली का? या अवाढव्य संख्या ज्या सिद्ध करतात की जीवसृष्टी हा केवळ योगायोग नाही यांनी प्रभावित झालात का?

जीवनात आणखी काही आहे का?

जीवनात आणखी काही असेल तर काय ?  विज्ञान सुद्धा वारंवार हेच सिद्ध karat आहे की जीवन हा काही निव्वळ योगायोग नाही. अगदी महान वैज्ञानिकांना आपल्या अस्तित्वाबद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

हा काही अपघात नाही

जर जीवन म्हणजे अनुक्रमें घडणाऱ्या योगायोगांची मालिका हि संभाव्यता अशक्य असल्याचे सिद्ध झाले तर सर्व अस्तित्वांमागे काही योजना असू शकते. जर हि बुद्धीमत्ता एक सृष्टिकर्ता असेल ज्याने सर्व विश्वाची रचना केली असेल, ज्यामध्ये आम्ही ज्या पृथ्वीवर जगत आहोत, त्याचाही समावेश आहे.

असा विचार आपणास काही हानी पोहोचवेल का?

बुद्धिमान योजना

जर सर्व अस्तित्वांच्या मागे काही  योजना असेल तर तिथे एक रचनाकार असलाच पाहिजे.हा कोणत्या प्रकारचा रचनाकार असेल?

तुम्ही,ज्याने आपल्या आसपासच्या सर्व गोष्टींची रचना केली त्याची प्रतिमा तयार करू शकाल  का? आपल्या कल्पनेपेक्षाही अत्यंत अचूकपणे, बारकाइने, गुंतागुंत हाताळणारा एक कुशल रचनाकार! अद्यापही शतकांच्या वैज्ञानिक संशोधनानंतर, आम्हा मानवांना अनेक तपशील माहित नाहीत किंवा समजत नाही. तेंव्हा तो एक अदितीय असा वास्तुविशारद असावा!

एक वास्तुविशारद

हा निर्माता कसा असेल ? तो नक्कीच एक अतिशय शक्तिशाली आणि परिपूर्ण असा असला पाहिजे. तसे नसते तर आपण जे पाहू शकतो ते सर्व इतक्या परिपूर्णपणे आणि तपशीलवार तो घडवू शकला नसता.

निसर्ग इतका परिपूर्ण बनला आहे की आपण मानवांना- विज्ञानाच्या इतक्या वर्षानंतरही त्यातील केवळ थोडे तुकडेच समजतात. हे सर्व निर्माण करणारी नक्कीच एक अद्भूत बुद्धी असणार.

एक परिपूर्ण रचना

असा हा निर्माता गोष्टी अचूकच बनवेल नाही का? बघा आजूबाजूला … तुम्हाला काय दिसते? सर्वकाही परिपूर्ण आहे का? कदाचित तुम्ही म्हणाल की नाही. एकंदर प्रत्येक गोष्ट परिपूर्ण दिसत नाही. पण निसर्गाच्या अचूक काम करणाऱ्या कायद्यांमुळे स्वतःचेच नुकसान करणारा गोंधळ सुद्धा अस्तित्वात नाही.

आज विचार करण्यासाठी:

  • हे विश्व एका निर्मात्याने निर्माण केले आहे, असा विचार तुम्ही करू शकता का?
  • हा कशा प्रकारचा रचनाकार असेल?
  • जर ही रचना इतकी अचूक आहे तरीही काही अपूर्णता किंवा दु:ख का असेल?
  • जर रचनाकार असेल, तर तुम्ही स्व:ता pan त्याचीच निर्मिती असाल, बरोबर?

यावर अजून विचार मंथन व्हायला हवे? आज दिवसभर या विषयी विचार करा. आपण आता उद्या परत भेटू, तिसऱ्या दिवशी.

3 दिवस सुरू ठेवा

.