दिवस 1 – पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती

दिवस 1 – पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती

आयुष्याच्या अर्थ शोधण्यासाठी, आधी जीवन सुरु कसे झाले हे पाहूया. बघुयात की वैज्ञानिकांनी काय शोधले आहे.

एखाद्या ग्रहावरील जीवन शक्य होण्यासाठी, आपल्याला कमीतकमी 2 महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता आहे. 1966 मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल सिगन यांनी हे शोधून काढले.

सुरुवातीला तेथे एक सुयोग्य तारा असावा: उर्जा स्त्रोत (सूर्य)

दुसरे म्हणजे ताऱ्यापासून ग्रहापर्यंतचा अंतर योग्य असणे आवश्यक आहे. खूप लांब अंतर असेल तर खूप थंडी, आणि ग्रहापासून जर सूर्य खूपच जवळ असेल तर जीवनासाठी खूप उष्णता असेल.

कार्ल Sagan ने गणना केली की पृथ्वीतलावर 1,000,000,000,000,000,000 ग्रह आहेत जे जीवनासाठी योग्य आहेत.

1966 पासून काय घडले? शास्त्रज्ञांनी जीवन आणि विश्वाबद्दल अजून अभ्यास केला. जसजसा आपण अधिक अभ्यास केला, तसतसे पृथ्वीवर जीवसृष्टी शक्य होऊ शकेल असे आणखी मापदंड सापडले.

पृथ्वीवर जीवन शक्य नाही!

अधिक संशोधनानंतर, अनेक नवीन निकष आढळले. पहिल्या 10, नंतर 20 आणि अगदी 50 पेक्षा जास्त! ग्रहवर जीवसृष्टी शक्य होण्यासाठी आवश्यक. म्हणूनच जीवसृष्टी जगवू शकतील अशा ग्रहांची संख्या झपाट्याने खाली आली.

प्रत्यक्षात  … कोणताही ग्रह (अगदी पृथ्वीही!) उस्फूर्त जीवसृष्टीला पोषक नाही. सर्व अत्यावश्यक निकषांनुसार खरतर आम्ही जिवंतही असणार नाही! तरीही येथे आपण आहोत … जिवंत … आणि जीवनाबद्दल विचार करत.

हे सर्व समजल्यावर इतर कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी आढळत नाही ह्याचे कदाचित काहीच आश्चर्य वाटणार नाही.

यापेक्षाही अजून काही आहे

आज विज्ञानाने शोधून काढले आहे की एखाद्या ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्त्वासाठी किमान २०० मानदंडांची आवश्यकता आहे. एवढेच नाही तर, त्यातील प्रत्येक घटक योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे आणि यातील बरेच घटक एकमेकांवर अवलंबून असतात. जर ते योग्य प्रमाणात नसतील, तर संपूर्ण गोष्टच नष्ट होईल.

उदाहरणार्थ: एखाद्या भव्य ग्रहाला (ज्युपिटरसारखा) जवळ असणे आवश्यक आहे. ज्युपिटरचे  गुरुत्वात्कर्षण अंतराळातील हजारो तुकड्यांना, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळण्यापासून रोखते.

जीवन शक्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या बर्याच निकषांपैकी हे केवळ एक उदाहरण आहे.

विश्वातील जीवनाविरोधातील अडथळे अविश्वसनीय आहेत!

तरीही आपण अस्तित्वात आहोत!

तरीही येथे आपण आहोत, केवळ अस्तित्त्वातच नाही तर आपण आपल्या अस्तित्वबद्दल बोलत आहोत. हे कसे शक्य आहे? हा काय निव्वळ योगायोग आहे का की पृथ्वी ग्रहासाठी हे मानदंड अचूक लागू आहेत?

पृथ्वीवरील जीवन यादृच्छिक शक्तींचा परिणाम नाही हे कधी कबूल करणे योग्य राहील ? विशेषत: जेव्हा पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेली नेमकी बांधणी,संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वात असण्यासाठी  आवश्यक अशा नेमक्या बांधणीच्या तुलनेत “अगदी सोपी ” आहे!

एक उदाहरण: खगोलशास्त्रज्ञ आता असे मानतात की चार मूलभूत शक्ती (गुरुत्व, विद्युतचुंबकीय शक्ती, आणि “मजबूत” आणि “कमकुवत” परमाण्विक शक्ती) यांची मूल्ये बिग बँग नंतर एका सेकंदापेक्षा कमी पटीच्या आत निश्चित होतात. कोणतेही एक मूल्य बदला आणि विश्व अस्तित्त्वात येऊ शकत नाही उदाहरणार्थ, जर अणुऊर्जा बळ आणि विद्युतचुंबकीय शक्ती यांच्यातील गुणोत्तर किंचित जरी बदलले तरी अगदी,100,000,000,000,000,000 च्या एका प्रमाणात तरीही एकही तारा कधीही अस्तित्त्वात आला नसता  .

आपण आश्चर्यचकित झालात?

या विषयावर आपले स्वत: संशोधन जरूर करून पहा. आजपर्यंत विज्ञानाने काय गोष्टींचा शोध लावला आहे हे स्वत: जाणून घ्यायचा प्रयत्न करा.कृपया लक्षात घ्या की शास्त्रज्ञांचेही काही पूर्वग्रह आहेत जे त्यांच्या निष्कर्षांना प्रभावित करतात.

हा योगायोग नाही

सर्व परिचीत मानदंड योग्य परिस्थितीमध्ये सेट केल्याची परिस्थिती ही अशी आहे की नाणेफेक करावी  सलग एका ओळीत 1,10,000,000,000,000,000,000 वेळा छापा यावा. हे खरोखर शक्य आहे का?

बिग बँग बद्दल काय?

फ्रेड होयेल या खगोलशास्त्रज्ञाने “बिग बैंग” या संकल्पनेचा शोध लावला. एक ज्ञात सिद्धांत ज्या च्या अनुसार अब्जावधी वर्षांपूर्वी एका मोठ्या स्फोटाने विश्वामध्ये जीवसृष्टीची सुरुवात झाली. जरी फ्रेड होल नास्तिक होता, तरीही ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक मानदंड पृथ्वीवर अस्तित्वात आहेत हे पाहून स्तंभित झाला. होयेलने लिहिले आहे-” उपलब्ध तथ्यांच्या अनुसार एक सर्वसामान्य निष्कर्ष असे सुचवितो की एक असामान्य बुद्धिमत्तेची भौतिकशास्त्र, तसेच रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र सह भूमिका पर पडली आहे..”

जर शास्त्रज्ञ जीवनाचे उत्पत्ती पूर्णपणे विषद करू शकत नसले तर जीवनाचा स्त्रोत काय असू शकतो?

हे सर्व इतके क्लिष्ट आणि गुनातागुंतीचे का आहे की आपण बर्याच वर्षांच्या वैज्ञानिक संशोधनांनंतरही पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही?

आजच्याबद्दल विचार करण्यासाठी

हे सर्व दिवस 1 साठी. आपण या साऱ्याचा उर्वरोत दिवसामध्ये विचार करू शकता.

आपल्यासाठी काही उपयुक्त प्रश्न:

  • पृथ्वीवरील जीवन हे केवळ योगायोगावर आधारित आहे का या सर्वांमागे काही बुद्धिमत्ता असू शकते?
  • जीवनासाठी आवश्यक निकषांवर आपण काही अधिक संशोधन करू इच्छित असल्यास, कृपया करावे.
  • मी इतर लोकांपेक्षा वेगळा का आहे?
  • माझ्या अस्तित्वासाठी काही कारण आहे का?

आपल्या पुढील दिवसासाठी उद्या परत या.

 

दिवस 2 वर सुरू ठेवा

काही असे घटक जे पृथ्वीवरील जीवन शक्य होण्यासाठी आवश्यक आहेत

खालील प्रतिमा आपल्याला पृथ्वीवरील जीवनास समर्थन देण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक कारकांपैकी काही दर्शवितात. ही परिस्थिती अचूकपणे आणि योग्य प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे, नाहीतर जीवन अजिबात शक्य होणार नाही.

infographic Some of the Factors That Allow Life on Earth to Existजीवनासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांविषयी अधिक माहिती: पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आवश्यक कोणते घटक आहेत

दिवस 2 वर सुरू ठेवा